बाई, भारतीय पुरुष, ‘Sex of Politics’ आणि ‘Politics of Sex’
भारतीय पुरुष त्याचा लैंगिक अवयव नेहमीच ‘शस्त्रा’सारखा वापरतो. त्याला राजकारणाची जोड मिळाली की, त्याचा तो ‘दांडपट्टा’ करतो. आता राजकारणी जर लैंगिकबाबतीत इतके बेबंद असतील, तर तसेच बेबंद असलेले भारतीय पुरुष उद्योजक, समर्थक, पुढारी, शासकीय अधिकारी, चेले-चमचे या राजकारण्यांच्या आश्रयाला येणारच की! त्यात जात, मतदारसंघ, निष्ठा या गोष्टीनुसार वर्गवारी होऊन या बेबंद भारतीय पुरुषांना बेबंद राजकारण्यांकडून अभय मिळतं.......